Header Ads Widget


शहादा नगरपालिका संचलित म्युन्यूसिपल स्कूलची जीर्ण झालेल्या इमारतीची दुरुस्ती व प्लास्टरचे काम सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील नगरपालिका संचलित म्युन्यूसिपल स्कूलची जीर्ण झालेल्या इमारतीची दुरुस्ती व प्लास्टरचे काम सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले असून शहादा शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. शहादा शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांनी गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.इमारत जीर्ण झाली असून वेळोवेळी छताचे प्लास्टर खाली पडत असते.विद्यार्थी भयभीत झालेले होते.एखाद्या वेळी मोठी घटना घडण्याची शक्यता होती.मात्र नगरपालिका प्रशासनातर्फे दखल घेतली जात नव्हती म्हणून शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांची भेट घेऊन इमारत त्वरित दुरुस्त करावी म्हणून निवेदन दिले होते.इमारतीची दुरुस्ती व स्लॅब दुरुस्ती न केल्यास नगरपालिका आवारात आंदोलन करण्याच्या इशारा देखील दिलेला होता.  शेवटी नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी चौकशी करून कामाला सुरुवात केलेली आहे.धोकेदायक भाग काढला जात असून प्लास्टर देखील काढले जात आहे.नवीन प्लास्टर करण्यात येत आहे.मुख्याध्यापक व शिक्षकांनी देखील सुटकेच्या निश्वास सोडला आहे. कामाची पाहणी करण्यासाठी शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे सह जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा शहर उपाध्यक्ष लव लोहार व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल योगेश कोठारी अभय जैन जगदीश बागुल सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याध्यापकांची देखील चर्चा केली.

Post a Comment

0 Comments

|