Header Ads Widget


लोक न्यायालयात ३६५ केसेस निकाली होऊन त्यात २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपये वसूल...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील लोक न्यायालयात ३६५ केसेस निकाली होऊन त्यात २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपये वसूल करण्यात आले.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार व शहादा तालुका विधी सेवा प्राधिकरण तसेच शहादा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे २७ .जुलै २०२४रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात लोकन्यायालया चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुका विधि सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एम गुप्ता यांनी सांगितले की लोकांच्या वेळ व पैसा वाचावा म्हणून शासनामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर न्यायालयीन वाद विवाद खटले आपसात समजूतीने निकाली निघावे म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात येते लोकांनी आपले वाद विवाद खटले आपसात समजूतीने मिटवून आपला वेळ व पैसा वाचवावा लोकांनी जास्तीत जास्त आपले खटले सामंजस्याने मिटविण्याचे आव्हान केले.या लोक आदालत मध्ये न्यायालयीन १०७५ तसेच दाखल पूर्व त्यात बँका व ग्रामपंचायतीमधील घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीदारांचे ४५८० असे एकूण ५६५५ केसेस ठेवण्यात आले होते. त्यापैकी न्यायालयीन -१३७ खटले तर दाखल पूर्व - २२८ खटले असे एकूण -३६५ खटले निकाली निघाले यात - २ कोटी ४४ लाख ७ हजार ९१७ रुपये वसूल करण्यात आले.यासाठी चार पॅनल ची नेमणूक करण्यात आली होती यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एम गुप्ता यांचे सोबत ॲड. एम एस साळवे , दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यु एन पाटील यांचे सोबत ॲड.बी पी शिंदे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही.व्ही निवघेकर यांचे सोबत ॲड.सी डी भंडारी ,न्यायमूर्ती श्रीमती एस आर पाटील यांच्यासोबत ॲड.आर एम सोनवणेअसे एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते यावे वकिल संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक अधीक्षक एस व्ही जंवंजलकर ,वरिष्ठ लिपिक विलास सी सूर्यवंशी, किशोर ठाकुर स्टेनो एम टी घुगे, यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments

|