Header Ads Widget


जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी साक्री तालुक्यातील करण सोनवणे व करीना भामरे यांची निवड ...

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
साक्री तालुका स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात निजामपुरच्या भानुबेन वाणी पब्लिक स्कुल चा करण सोनवणे प्रथम तर कासारे येथील बहुउद्देशीय विद्यालयाची करीना भामरे हिने द्वितीय बक्षीस मिळवत जिल्हा स्तरीय मेळाव्यासाठी निवड करण्यात आली.    साक्री तालुक्यातील इयत्ता ६ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री, मुख्याध्यापक संघ, साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने भाडणे येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात ३० जुलै रोजी तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला.बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री एज्युकेशन फ़ौंडेशन चे अध्यक्ष डॉ.अशोक पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष पी.झेड.कुवर, विज्ञान मंडळाचे सल्लागार एन.एस.साळूंके, सुहास सोनवणे, मुख्याध्यापक एन.वाय.सोनवणे, पी.आर.नांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विज्ञान मंडळाचे सल्लागार एन.एस.साळूंके,सदस्य एन.डी.जाधव,एस.आर.सोनवणे यांचा त्यांच्या सेवानिवृत्तीबाद्दल सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर मेळाव्यात ११ स्पर्धकांनी सहभाग घेतला. साक्री तालुका स्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात "कृत्रीम बुद्धीमत्ता :- संभाव्यता व आव्हाने”" या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत निजामपुरच्या भानुबेन वाणी पब्लिक स्कुल चा करण मोतीलाल सोनवणे प्रथम, कासारे येथील बहुउद्देशीय विद्यालयाची करीना हंसराज भामरे हिने द्वितीय तर न्यु इंग्लिश स्कुल साक्रीच्या भुपेंद्र किरण नेरकर यास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्रा.जहागिरदार साळूंके व मुख्याध्यापक सुनिल देसले यांनी परीक्षक म्हणून काम केले तर वेळ नियंत्रक हेमंत शिंदे होते. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष के.एस.बच्छाव यांनी केले. सुत्रसंचालन मंडळाचे सचिव ए.एस.पाटील यांनी केले तर आभार आर.एस.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे शेखर ठाकरे, हंसराज देसले, सी.एल.देसले, जी.आर.देवरे, श्रीमती एम.बी.भदाणे, दिग्विजय पाटील, पी.डी.खामगळ, आर.बी.माळचे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

|