Header Ads Widget


पालक आपापल्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अद्यापही शहादा शहरातील विविध दुकानांवर गर्दी करतांना दिसत आहे...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शालेय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना होण्यात आला.विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होण्यात आली आहे.वरिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.मात्र अद्यापही पालक आपापल्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अद्यापही शहादा शहरातील विविध दुकानांवर गर्दी करतांना दिसत आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना मोफत पुस्तके पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ मार्फत दरवर्षी दिली जातात.पण मुलांना इतर शैक्षणिक साहित्य आवश्यक असल्याने वह्या कंपास पेटी रंगपेटी पेन पेन्सिल सह इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागते.पालक अद्यापही साधारणतः सायंकाळच्या वेळी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांवर दिसतात. ग्रामीण भागातील पालक वर्ग देखील शहादा शहरात मुलांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात.अद्यापही खरेदी सुरू आहे.सर्वाधिक गर्दी महिला पालकांची असते.शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य पालक आर्थिक विवंचनेत सापडला आहे मात्र मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करणे आवश्यक असते.एकंदरीत शहादा शहरात वेगवेगळ्या दुकानावर पालकांची गर्दी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments

|