Header Ads Widget


शहादा ते भादे रस्ता दरम्यान अवजड वाहनांमुळे दोन वेळा पाईपची फरशी तुटल्याने शेतकरी नागरिक व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास ;दुरुस्ती न केल्यास परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या मार्गावर....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील शहादा ते भादे रस्ता दरम्यान अवजड वाहनांमुळे दोन वेळा पाईपची फरशी तुटल्याने शेतकरी नागरिक व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून कोणताही वरिष्ठ अधिकारी शिवाय प्रशासन दखल घेण्यास तयार नसल्याने रस्ता जवळजवळ बंद होण्यात आलेला आहे परिणामी पाईपची तुटलेली फरशी त्वरित चांगल्या दर्जाची दुरुस्ती न केल्यास परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या मार्गावर आहेत. डामरखेडा गावाजवळील गोमाई नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे.या पुलाला जवळजवळ ७० वर्षे होण्यात आलेली आहेत.त्यामुळे पुलाची मुदत संपलेली आहे.अवजड वाहने गेल्यास केव्हाही पुलाला धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.तसेच पुलाखाली प्रकाशा येथील तापी नदीवरील बेरीज असल्याने पाण्याच्या फुगवटा डामरखेडा गावापर्यंत गेलेला आहे.पूल नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या पुलावरील वाहतूक बंद करून प्रकाशा पासून काथरदे भादे पिंगाने मार्गे शहादा अशी वळविण्यात आलेली आहे.सर्व प्रकारची वाहतूक या रस्त्याने सुरू आहे.सातत्याने अवजड वाहने देखील सुरू आहेत.आधीच पिंगाने ते काथरदे पर्यंत अरुंद रस्ता आहे.त्यामुळे दोन मोठी अवजड वाहने पास करणे देखील कठीण जाते.अशी परिस्थिती असताना पिंगाने ते भादे दरम्यान अवजड वाहनांमुळे पाईपची फरशी तुटली आहे.तिला दोन वेळा दुरुस्त करण्यात आली.मात्र अवजड वाहनांमुळे सरळ ते पाईप फुटतात व जमीन दोस्त होतात.दुरुस्तीच्या कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही.दोन वेळा पाईप टाकण्यात आले.वास्तविकता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फरशी दुरुस्त करणे आवश्यक होते पण केवळ वेळ काढू पणा केलेला आहे त्याच्या परिणाम म्हणून पुन्हा फरशी तुटली आहे.शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.नागरिक व वाहनधारक यांनी डोक्याला हात लावलेले आहेत.कोणताही अधिकारी अद्याप आलेला नाही.त्यामुळे भादे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आहे.

        फरशी तुटल्याने सर्वांनाच त्रास होतो आहे.हा रस्ता कधी खराब झालेला नव्हता मात्र प्रकाशापासून वाहतूक वळविल्याने अवजड वाहनांमुळे रस्ता खराब झाला व फरशी तुटली आहे.आतापर्यंत कोणीही वाली नाही.शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.कोणीही जबाबदारी स्वीकारला तयार नाही.फरशी दुरुस्त न केल्यास आम्ही या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद करणार.वाहतूक काथरदे -पाडळदा मार्गे वळूवून काथरदे गावाजवळ फलक लावण्यात यावा-उत्तम बन्सीलाल पाटील-शेतकरी भादे तालुका शहादा.

Post a Comment

0 Comments

|