Header Ads Widget


स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी व पालकांच्या गौरव करण्यात आला...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा: गणेश सोनवणे:शहादा येथील सातपुडा शिक्षण संस्था संचलित शारदा कन्या माध्यमिक विद्यालय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी व पालकांच्या गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनमाई शिक्षण संस्थेच्या सचिव व स्काऊट गाईड जिल्हा आयुक्त वर्षा जाधव संस्थेचे समन्वयक संजय राजपूत मुख्याध्यापिका एस. झेड.सैय्यद पर्यवेक्षक आर.एफ.पाटील उपस्थित होते.प्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक याच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. नंतर इयत्ता दहावी ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींच्या तसेच पालकांच्या गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थिनी कस्तुरी निझरे हिने मनोगत व्यक्त केले. समन्वयक संजय राजपूत यांनी बोलतांना कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळतं.भविष्यात उज्वल यश मिळण्यासाठी विद्यार्थिनींनी मेहनत करावी.अभ्यासात जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस.एस. मोरे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|