Header Ads Widget


श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व विश्व हिंदू परिषद शाळेच्या वतीने श्रद्धांजलीचे आयोजन...

 


      नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:नुकतीच उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेने 122 निष्पाप लोकांच्या मृत्यू झाला. त्या पुण्य आत्म्यास चिरशांती मिळावी म्हणून श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व विश्व हिंदू परिषद शाळेच्या वतीने श्रद्धांजली चे आयोजन करण्यात आले होते.  येथील महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण हौसिंग सोसायटी गांधीनगर येथील श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावांत एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत पळापळी मधे तब्बल १२२ निरागस बालका सहित महिला बघीणी व निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. त्या जीव गमावलेल्या पुण्य आत्म्यांना सद्गती आणि शांती लाभावी म्हणून विश्व हिंदू परिषद शहादा श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समिती युवा पुरोहित मंडळी शहादा यांच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले होते . त्यात ब्रम्हवृंदाचा पठणानंतर गितेतील सातव्या अध्यायाचे सामुहिक पठण सोबत सामुहिक महामृत्युंजय मंत्राचा जप करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तेव्हा सर्व प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अजय शर्मा यांनी घडलेल्या घटनाची संक्षिप्त माहिती दिली. नंतर पुरोहित शेखर राव, विजय जोशी, सुभाष कुलकर्णी, मदनलाल शर्मा सोबत युवा पुरोहित पियुष जोशी , द्वारकेश बुवा,अनिकेत जोशी, सिध्दार्थ राव यांनी सातव्या अध्यायाचे पठण केले तदनंतर महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. तेव्हा भाजपचे नेते डॉ कांतीलाल टाटिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघचालक अजय शर्मा , भोई समाजाचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक सुपडु खेडकर, समस्त हिंदू तेली समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, माजी नगरसेवक डॉ योगेश चौधरी, शहादा नागरी हित संघर्ष समिती चे अध्यक्ष यशवंत चौधरी,संकल्प ग्रुप चे अध्यक्ष पिनाकिन पटेल,b महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण हौसिंग सोसायटी चे व्हाइस चेअरमन मोहन पाटील, सचिव जयेंद्र चव्हाण, संचालक मोहनसिंग राजपूत, यशवंत पटेल, मुकुंद भावसार, संचालिका श्रीमती करुणाताई पाटिल, श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समिती चे विश्वस्त विशाल गारोळे, नरेंद्र परदेशी, लक्षमण बोरदेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेंद्र चौधरी, मिनानाथ सोनार, ललीत अग्रवाल, लक्ष्मीकांत अग्रवाल, तुषार बडोदेकर, विक्रम पटेल, सामाजिक कार्यकर्ते के के सोनार , राहुल चौधरी, लाला पटेल, संजय पाटील, शिरीष पाटिल, दिनेश नेरपगार, लक्ष्मीकांत वसावे, यांच्या सह शहरातील व परिसरातील असंख्य सनातनी सत्संगी हिंदू बांधवांसोबतच गांधीनगर सोसायटीतील महिला बघीणीं कार्यक्रमाला उपस्थित होते शेवटी यशवंत चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

|