Header Ads Widget


शेवाळीचे सुपुत्र प्रा.प्रकाश सोनवणे यांचा मुबईत म.रा. काँ.क.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार...

 



साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले या यशासाठी विविध सेल, विभागाकडून उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा दि.३ जुलै रोजी रोजी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रदेश काँग्रेसच्या शिक्षक विभागाने राज्यभर लोकसभा मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार केला व महाविकास आघाडीस घवघवीत यश प्राप्त झाले. त्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी मां.रमेश चेंनिथला जी, अ.भा. कॉ. सरचिटणीस मां. के. राजू, अ.भा. काँ. एससी विभागाचे प्रमुख व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मां.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रदेश प्रमुखांना शाल, व सन्मानपत्र देऊन हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या वेळी साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.)गावाचे सुपुत्र सद्या मुंबई येथे वास्तवाला असलेले म.रा.काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा.प्रकाश सोनवणे यांचा हि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. सोनवणे यांचा मान्यवरांकडून सत्कार झाल्याबद्दल त्यांचें राज्यातील शिक्षकांकडून तसेच साक्री तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments

|