Header Ads Widget


शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा भा.द.वि. कलम 377 नोंद होऊन देखील आरोपीला अभय कोणाचे बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे ;आरोपीस ताबडतोब अटक करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा: संविधान आर्मी नंदुरबार

  


नंदुरबार/ प्रतिनीधी:
दिनांक 23/6/2024 रोजी एकनाथ ओंकार कुवर याच्यावर तीन वर्षाच्या बालकाशी अश्लील चाळे व अनैसर्गिक संभोग करणे बाबत शहादा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम 377 व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे सदर गुन्हा दाखल होऊन आज 15 ते 16 दिवस झालेत तरी सदर व्यक्ती हा बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे हे सर्व अश्लील चाळे करताना त्या तीन वर्षाच्या बालकाच्या आईने स्वतःच्या डोळ्यांनी सदर घटना बघितली व शहादा पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे त्यातच सदर व्यक्तीवर शहादा पोलीस स्टेशन येथेच कलम 376 चे 2 ते 3 गुन्हे नोंद आहे तरी,सदर व्यक्ती हा बिनधास्तपणे मोकाट फिरत असून त्याच्यामुळे सदर कुटुंबाचे जीवास धोका आहे. कारण असे करणे म्हणजे तो मानसिक रुग्ण तर नाही ना ? असा संशय निर्माण होतो व इतके होऊन देखील शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस सदर व्यक्तीला अटक का करीत नाही व इतकी खुली सुट का म्हणून देण्यात येत आहे या कारणांमुळे म्हणून पोलिसांच्या चारित्र्यावर व विश्वासावर देखील शंका येते आहे.पोलीस प्रशासनाने दखल घेऊन सदर व्यक्तीस ताबडतोब अटक करून कार्यवाही करावी जर पीडित परिवाराला त्याच्यापासून काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल कृपया आपण याची नोंद घ्यावी. व सदर व्यक्तीवर ताबडतोब कार्यवाही करून अटक न झाल्यास संविधान आर्मी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मा. पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे आमरण उपोषणास बसू व त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे.अवैध धंदे व गुन्हेगारीवर आळा घालून नंदुरबार जिल्ह्यात एक वेगळी ओळख असणारे कर्तव्यदक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. विशेष लक्ष घालून काय कठोर कार्यवाही करतील यांवर सर्व जिल्हावासियांचे  लक्ष लागून आहे....

Post a Comment

0 Comments

|