Header Ads Widget


जैन शेतांबर तेरापंथी समाजाचे गुरु आचार्य श्री महाश्रमणजी यांचे साक्री शहरात जोरदार स्वागत ...

 

   




साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
जैन तेरापंथ धर्मसंघांचे 10 वे आचार्य श्री.महाश्रमण जी हे महाराष्ट्रभर आपल्या धवल सेना सह पायी यात्रा करून नैतिकता,व्यसनमुक्ती,मैत्री,सदभावना या सारखे उपदेश देऊन लोकांना जनजागृक करण्याचे काम करीत आहे.55 हजार किलोमीटर यात्रा करून गुरुदेव साक्री शहरात आले होते. सकल जैन समाज,तेरापंथ समाज सहित सर्व स्तरावरील लोकांनी आचार्यच्या दर्शन साठी मोठी रांग लावली दिवसभर दर्शन,सेवा सुरु होती साक्री परीसरात आनंदाचे वातावरण झाले होते. साक्री शहरातील राजे लॉन्स येथे आचार्य श्री महश्रमण जी यांचा महाराष्ट्र स्तरीय मंगल भावना समारोह आयोजित केले होता.कार्यक्रमात,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, पत्रकार आदी सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅली शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाचे नियोजन जैन तेरापंथ समाज आणि निवेदन सकल जैन समाज यांनी केले होते.गुरुवर्य यांचे विहार साक्री पासून 5 कि.मी अंतरावर असलेल्या फॉर्मसी कॉलेजला ठेवण्यात आले होते दुसऱ्या दिवसी आचार्य जी सामोडेहुन पिंपळनेरला आगमन करीत तिसऱ्या दिवसी आचार्य श्री महाश्रमणजी आपल्या सहकार्यासोबत सुरत पद यात्रेसाठी रवाना होतील अशी माहिती समाज बांधवांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

|