Header Ads Widget


शेवाळीत शिव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न...

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
साक्री तालुक्यातील शेवाळी(दा)येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील ई.10 वीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.'शिव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 2014 पासून अविरतपणे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात येतो . या वर्षीही परंपरा चालू ठेवत सन. 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यालयात

प्रथम क्रमांक कु. प्राची अशोक साळुंके , 

द्वितीय क्रमांक कु. सृष्टी दिपक साळुंके व 

तृतीय क्रमांक चि. अक्षय नंदू पवार

यांचा पारितोषिक व प्रथम बक्षीस स्वरूपात 1001 रुपये, द्वितीय 701 रुपये व तृतीय 501 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित शिव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.श्री.अनिलजी नांद्रे . श्री कारभारी साळुंके, राकेश साळुंके, श्री प्रवीण साळुंके, श्री श्याम बोढरे,श्री चंद्रकांत जाधव व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता नाईक आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|