Header Ads Widget


अपघाताची शक्यता ;संबंधित विभागाने तात्काळ खड्डा बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा अशी मागणी.,


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे: मामाचे मोहिदा तालुका शहादा गावाजवळ असलेल्या नाल्यावरील फरशी च्या भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्यालगत मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तात्काळ खड्डा बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

           शहादा येथून जयनगर, उभादगड,धांद्रे, वडाळी, कोंढावळ, निंबोरा,कहाटूळ,कवठळ,सोनवद, मामाचे मोहिदा आदी गावांकडे जाण्यासाठी मोहिदा या गावावरून जावे लागते. दरम्यान या मुख्य रस्त्यावरील फरशी पुलाचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या जागी अनेक लहान अपघात झाले आहेत. मोठा अपघात होण्याची भीती वाहनधारकांमध्ये असून संबंधित विभागाने तात्काळ फरशी पुलावरील रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments

|