Header Ads Widget


हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात दिनांक एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेचा सचिव वर्षा जाधव यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेचे समन्वयक संजय राजपूत प्राचार्य महेंद्र मोरे उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक खान ए.ए. अनिल खेडकर उपस्थित होते.सकाळ सत्रात देखील अभिवादनाच्या कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेरकर यांनी केले तर स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल सचिन मुंजाळ यांनी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दरम्यान वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या स्पंदन या भितीपत्रकाचे उद्घाटन प्राध्यापक संजय जाधव व वर्षा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यावरील विविध माहिती व छायाचित्र गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.भित्तीपत्रक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी माळी यांनी केले. तर वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयात देखील जयंती साजरी करण्यात आली.वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोषकुमार पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर एच एस पाटील यांनी विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाला प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|