Header Ads Widget


उत्तुंग बाल वैज्ञानिक स्पर्धेचा निकाल जाहीर ! मयुरी अविनाश पाटील ISRO अभ्यास सहल साठी निवड

उत्तुंग बाल वैज्ञानिक स्पर्धेचा निकाल जाहीर

नंदुरबार तालुका विधायक समिती चे श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय वैदाणे येथील  मयुरी अविनाश पाटील हिची ISRO अभ्यास सहल साठी  निवड 

प्रतिनिधी : प्रकाश इंदवे : नुकतीच राज्यभरात उत्तुंगतेज फाउंडेशन तर्फे  बाल वैज्ञानिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत राज्यभरातून 2300 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातून 300 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली त्यात वैंदाणे गावातील श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय वैंदाणे या शाळेतील विद्यार्थिनी  मयुरी अविनाश पाटील हिचा राज्यात तेरावा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे या विद्यार्थिनीची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी साठ विद्यार्थ्यांमध्ये निवड करण्यात आली आहे, तसेच शाळेतील विवेक बंसीलाल पाटील हा विद्यार्थी जिल्ह्यात द्वितीय. 

उत्तुंगतेज फाउंडेशन चे संस्थापक रामेश्वर हालगे हे बऱ्याच वर्षापासून विज्ञान क्षेत्रात विविध उपक्रम राबवून राज्यभर विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहेत.इस्रो ,आयआयटी यांसारख्या उच्च संस्थांना भेट देऊन तेथील कार्यप्रणाली चा अभ्यास केल्यास विद्यार्थी तसे स्वप्न बघतील आणि ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञ होण्याकडे कल वाढावा असा उद्देश ठेवून याचे आयोजन केले जाते.

या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे चेअरमन आ.भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी , व्हा.चेअरमन मा. मनोज भैय्या रघुवंशी,संस्थेचे सचिव मा. यशवंत नाना पाटील, कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र भैय्या रघुवंशी,शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र गिरासे,शिक्षक कर्मचारीवृंद तसेच गावकऱ्यांकडून  शुभेच्छा देण्यात आल्या. या विद्यार्थीनीला शाळेतील विज्ञान शिक्षक श्री एजाज खाटीक सर याचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments

|