Header Ads Widget


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसेनेचा 58 वर्धापन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते मांगणवाडी येथील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी इन्कलाब फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सुरू असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी इन्कलाब फाउंडेशनचे संदीप राजपाल भारती पवार व स्मिता पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होतेशहरातील व्हॅलंटरी स्कूल तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन एडवोकेट राजेश कुलकर्णी मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाला तालुकाप्रमुख राजू लोहार जिल्हा संघटक मधुकर मिस्त्री शहर प्रमुख सागर चौधरी जिल्हा युवा सेना अधिकारी राकेश पावरा गणेश चित्रकथे प्रवीण सैंदाणे सागर पाटील भगवान अलकारी दीपक खेडकर राहुल चौधरी सुजित पावरा सुरेश मोरे दिलीप पाटील रमेश पवार जयसिंग गरुड जयसिंग वळवी बापू धनगर यांच्यासह शहरा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

|