Header Ads Widget


सीएटीसी कॅम्पमध्ये शहाद्याच्या पाच कॅडेटसला गोल्ड मेडल प्राप्त....

 


 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:एनसीसी कॅडेटसाठी झालेल्या विशेष शिबिरात सहभागी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे पाच एनसीसी कॅडेटसना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.दिनांक 1ते 12 जून या दरम्यान प्रताप महाविद्यालय अमळनेर जि.जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएटीसी (223) या कॅम्पमध्ये जवळपास जळगाव, धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यांचे 450 कॅडेट्स समाविष्ट झाले होते. त्यामध्ये ड्रिल कॉम्पिटिशन, गार्ड कॉम्पिटिशन, हॉलीबॉल कॉम्पिटिशन, खोखो कॉम्पिटिशन यासारख्या अनेक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. या कॅम्पमध्ये पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य शहादा महाविद्यालयातील एकूण 30 कॅडेट्स सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये शहादा कॉलेजच्या कॅडेट्सनी एकूण पाच गोल्ड मेडल प्राप्त केले. पहिले गोल्ड मेडल सीपीएल बादल भील यांना गार्ड कमांडरसाठी देण्यात आले. दुसरे आणि तिसरे गोल्ड मेडल गार्डसाठी कॅडेट विजय पारधी आणि भूषण पाटील यांना मिळाले,तर चौथे गोल्ड मेडल कॅडेट पंकज राठोड यांना पायलेटिंगसाठी भेटले. पाचवे गोल्ड मेडल सीपीएल मयूर साळी यांना बेस्ट कॉलेज सीनियर म्हणून प्राप्त झाले.सदर यशस्वी कॅडेटसचे अभिनंदन व कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ.एम.के.पटेल,एनसीसी कॅप्टन प्रा. एस.एल.भालेराव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|