Header Ads Widget


क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज संघटना व सातपुडा पावरा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ जून रोजी शहादा शहरातील डोंगरगाव चौफुली जवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समिती अध्यक्ष सुनील सुळे डॉक्टर भगवान खेडकर महेंद्र नाईक रवींद्र ठाकरे सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील माजी नगरसेवक अशोक मुकरंदे उदय वळवी भुरा पवार मनोहर पावरा कॉलरशिप पावरा रतिलाल ठाकरे प्राध्यापक रामसिंग वळवी अनिल चव्हाण प्राध्यापक अशोक वर्गसह मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक अशोक वळवी सुनील सुळे डॉक्टर भगवान खेडकर यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा तसेच दिलेली शिकवण बाबत मार्गदर्शन केले.क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी दिलेली शिकवण आदिवासी बांधवांनी आचरणात आणून आदर्श घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील सुळे यांनी केले तर आभार सचिन पावरा यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|