Header Ads Widget


राजपूत समाज मंडळ व जयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणुक....


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथे शहादा तालुका राजपूत समाज मंडळ व जयंती उत्सव समिती शहादा तर्फे दिनांक ८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या रथात प्रतिनिधी भव्य प्रमुख काढण्यात आली.मिरवणुकीत शेकडो समाज बांधव तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते.प्रथम शहादा शहरातील श्री महाराणा प्रताप सिंह स्मारकाच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील ॲड.सुवर्णसिंग गिरासे होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सारंगखेडा संस्थांचे देवेंद्रसिंह रावल मालपुर संस्थानचे महावीरसिंग रावल नंदुरबार येथील पत्रकार व ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्रसिंग राजपूत नंदुरबार तालुका राजपूत समाज अध्यक्ष मोहितसिंग राजपूत चिमठाणे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रवींद्र रावल माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा मोड तालुका तळोदा येथील राजेंद्रसिंग राजपूत प्रवीणसिंह राजपूत रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुमार भोई समाजाचे ज्येष्ठ नेते सुपडू खेडकर रवींद्र जमादार माकपाचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड सह मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी अभिवादन केले.उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मिरवणुकीच्या शुभारंभ करण्यात आला.मिरवणूक महाराणा प्रतापसिंह स्मारकापासून सरळ शासकीय विश्रामगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी पुतळा चार रस्ता नेहरू चौक तुप बाजार सोनार गल्ली पटेल चौक मार्गे काढण्यात येऊन समारोप करण्यात आला.मिरवणुकीत सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव माजी उपसभापती बापू जगदेव माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर पाटील उद्योजक नुह नुराणी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी संजय चौधरी सतीश जवेरी पत्रकार बांधव देखील सहभागी झाले होते.मिरवणुकीत मयुरी ट्रॅव्हल्स ग्रुप तर्फे लस्सी तसेच इन्कलाब फाउंडेशन ग्रुप पिनाकिन पटेल व सहकारी गुजरातथी मंडळ ज्ञानेश्वर चौधरी सह शिवछत्रपती ग्रुप माजी नगरसेवक विनोद सोनार यांनी शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती.उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी चूक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय राजपूत यांनी केले.मिरवणुकीसाठी शहादा तालुका राजपूत समाज मंडळचे पदाधिकारी व महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती सदस्यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments

|