Header Ads Widget


मुक्ताई कनिष्ठ महाविद्यालयाचा मोहित पाटील आयआयटी प्रवेशासाठी पात्र, जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण...

 



शहादा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:म्हसावद ता. शहादा येथील मोहित मंगेश पाटील याने JEE Advance परीक्षा खुल्या गटात उत्तीर्ण होवून आयआयटी प्रवेशासाठी पात्र (Qualify) ठरला आहे. मोहित हा रत्नागिरी (नोकरी निमित्त) येथे 2020 पासून महावितरण कंपनीमध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले मंगेश सुभाष पाटील यांचा मुलगा आहे.मोहित हा मुक्ताई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंगरगाव ता. शहादा या शाळेतून 12वीची परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोहित आणि त्याच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत पाटील, सचिव सौ. मुक्ताताई पाटील, शैक्षणिक समन्वयक प्रा. डी. सी. पाटील, प्राचार्या श्रीमती शर्मिला पाटील, सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षदा पाटील, शाळा प्रशासन आणि सर्व शिक्षक यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करीत उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या.

Post a Comment

0 Comments

|