Header Ads Widget


आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जमिनीत बेकायदेशीरपणे जमीनची मोजणी करणाऱ्यांवर कारवाई करा:सत्यशोधक शेतकरी सभा

 



नंदुरबार /प्रतिनिधी:
आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जमिनीत बेकायदेशीरपणे जमीनची मोजणी करू नये, आणि दि. ०७/०६/२०२४ रोजी नवापूर तालूक्यातील दापूर. बोरपाडा गावातील वनहक्क दावेदारांच्या मालकी हक्क मिळालेल्या जमिनीत बेकायदेशीरपणे घुसून शेतकऱ्याना न विचारता जमिनीचा सर्वे करीत असताना शेतकऱ्यानी विचारले असता त्यांना उडवा उडवीचे उत्तर दिले जात आहे. साक्री येथील रहिवासी असलेले रमाकांत काकुस्ते नावाचे इसमानी फोन करून सांगितले कि सदर सर्वे हा सोलर प्रोजेक्ट कंपनीचा सर्वे आहे त्यांचां मोबाईल कं.८५५४९९२३४० आहे तरी आपल्याला विनंती करण्यात येते कि दापूर व बोरपाडा हे गावे पेसा कायदा अंतर्गत येत असल्यामुळे व आदिवासी वन हक्क कायदा २००६ नियम २००८ सुधारित अधिनियम २०१२ नुसार वनजमिनीवर कोणतेही सरकारी, खाजगी प्रोजेक्ट राबविताना ग्रामसभेची व वनहक्क समितीची परवानगी घेतल्या शिवाय आदिवासीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा सर्वे करता येत नाही असे असताना सुद्धा दापूर व बोरपाडा ग्रामपंचायत व वनहक्क समितीला तसेच शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता परस्पर सर्वे चालू आहे. हा सर्वे बेकायदेशीर असून आदिवासींना देशोधडीला लावण्यासाठी वनखाते व कंपनीवाले प्रयत्न करीत आहे.तरी आपल्याला विनंती करण्यात येते कि हे बेकायदेशीर सर्वे ताबडतोब बंद करून त्यांची चौकशी करावी व चिंचपाडा वन क्षेत्रपाल यांनी परस्पर सर्वे करण्यासाठी परवानगी कशी दिली याची पण चौकशी करून संबधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने तीर्व आंदोलन करण्यात येईल या मुळे कायदा सुव्यावस्था बिघडल्यास सर्वस्व जबाबदारी संबधित अधिकारी राहतील असा इशारा देण्यात आला आहे....

Post a Comment

0 Comments

|