Header Ads Widget


वादळी वाऱ्यासह शहादा परिसरात पावसाचे जोरदार आगमन...

  

   




नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:काल नुकताच पावसाने वादळी वार्यासह शहादा शहर व आजूबाजूच्या खेड्यात जोरदार आगमन केले आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येतो आहे. पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवत आहे. असे असताना पावसाची हजेरी कशा पद्धतीने असते यावर सर्व खेळ नोंदवला जात असतो. वरून राजाने शहादा तालुक्यातील पूर्वेस असणाऱ्या सर्व खेडेगावांमध्ये हजेरी लावल्याचे चित्र आहे. कालच्या पावसाने मंदाना गावांतर्गत येणाऱ्या सावखेडा येथील सबस्टेशन हे संपूर्णपणे जलमय झाल्याचे चित्र होते. सावखेडा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे जंगल परिसर व इतर भागातील पाणी संपूर्णपणे जवळच असलेल्या सबस्टेशन मध्ये शिरल्याने वायरमन व लाईनमन याची मोठी पंचायत झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने विजेचे पोल व विजेवरील तार तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी सपूर्ण रात्रभर सेक्शन इंजीनियर भदाणे, वरिष्ठ तंत्रज्ञ सिकंदर शहा, निलेश पाटील व मंदाणे युनिटचे सर्व कर्मचारी यांना परिश्रम घ्यावे लागले. सब स्टेशन जवळ नाला असल्याने नाला देखील पूर्णपणे पाण्याने ओसंडून वाहू लागला होता. सर्व परिसर जलमय झाल्याने काम करण्यास देखील अडचणी येत होत्या. एकीकडे पाऊस झाल्याने शेतकरी राजा व नागरिक सुखावले होते तर दुसरीकडे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना बऱ्याच अडचणींचां सामना करावा लागला . पुन्हा पाऊस आल्यानंतर पाण्याच्या निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी सरपंच व पोलीस पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागले आहे

Post a Comment

0 Comments

|