नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील पूर्व भागातील चांदसैली घोडलेपाडा येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सी. आर. पी. एफचे जवान मेजर रमेश वसावे यांना राजस्थान अजमेर या ठिकाणी कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले. मेजर रमेश वसावे यांच्यावर घोडलेपाडा (ता. शहादा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. राजस्थान अजमेर येथे देशसेवेत कार्यरत असतांना त्यांची झारखंड येथे बदली (पोस्टिंग) झाल्याने अजमेर हुन गावाकडे येत असताना सोमवारी (दि.१० जून) रोजी अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मूळगावी घोडलेपाडा चांदसैली येथील स्मशानभूमीवर बुधवारी (दि.१२ जून) रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचे वृत्ताने गाव व परिसरातील गावांवर शोककळा पसरली. गाव व परिसर या घटनेने सुन्न झालेला आहे.
यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी रामदास पाटील, कल्याण संघटक हरसु बहादुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, प्रांत अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, विक्की पाटील, सीताराम पावरा, अमित पटले, माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे, माजी सैनिक दीपक पवार, माजी सैनिक पांडुरंग पवार, प्रकाश पवार, सरपंच प्रशांत पटले, पोलीस पाटील दशरथ पावरा, मेजर भवरसिंग अजमेर, मेजर सुमित बिले, मेजर एम. के. बना, मेजर मुकुल कुमार, जी.डी. इन्सपेक्टर केलजी अनिल दत्ताराम, एस. एस. सूर्यवंशी, बसवरात असवधी, रवी गड्डी, उमेश लकडे, सावंत डी. एस, राणा प्रतापसिंह, हितेश पवार, महेश्वरी हरीश, विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments