नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुक्यातील लोहार, कमरावद भागात मंगळवार सांयंकाळी वादळ वाऱ्याचा सुसाट वेगाने, विजेच्या कडकडाटने ढग फुटी सदृश्य पाऊसाने दमदार हजेरी लावली असल्याने महावीतरण कंपनीचे एलटी लाईनचे साठ-सत्तर पोल तर शेती पंपासाठी असलेले पंधरा वीस पोल पडल्याने इलेक्ट्रिक प्रवाह बंद झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरणी पुरक पाऊस झाल्याने शेतकरी कडुन बी-बीयाने खतांची खरेदी केली जात आहे.शहर व ग्रामीण भागात गत दोन महिने पासुन ऊन्हाळ्याचा तापमान वाढले होते. ४२-४५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तापमानाने ऐन दुपारी एक ते पाच दरम्यान घराच्या बाहेर पडण्याची धडपड करत नव्हते. तापमान वाढल्याने जमीन तापु लागली शेतातील ठिकठिकाणी भेगा पडु लागला होता. पाऊसाची सर्वच आतुरतेने प्रतिक्षा करत असताना मंगळवारी सायंकाळी अचानक वादळ वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. लोहारा, तितरी, टुकी, जवखेडा, अवघे, पिंप्रिं,गोगापूर,कमरावद, मंदाणा, यासह वीस पंचवीस गावाकडे मुसळधार पावसामुळे शेतात पाणीचपाणी झाले. ढग फुटी सदृश्य पाऊसामुळे शेतातील पाणी शेत बांध फोडून बाहेर पडत होते अनेक शेतकरी दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेले तर काहीचें शेत बांधच दिसेनासे झाले आहे.शेतात मुसळधार झालेला पाऊसाचे पाणी शेतात झिरपाव झाले आहे. दमदार पाऊस झाल्याने याभागातील शेतकरी सुकावले आहे. खरीप हंगाम सुरु झाल्याने पेरणी पुरक पाऊस झाल्याने शेतकरी दुसऱ्याच दिवशी शहराच्या ठिकाणी जाऊन बी-बीयाने, खतांची खरेदी करत आहेत. शहरातील कृषी खत दुकानावर शेतकरीची गर्दी दिसून आली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सावखेडा येथील राज्य महावितरण वीज कंपनीचे सब स्टेशन अंतर्गत असलेल्या भागात शेत जमीन पीकांना पाणी पुरवठा कृषी पंप मार्फत दिले जाते मात्र वादळ वाऱ्याने आठरा ते वीस पोल पडले आहेत. तसेच याभागातील लघु दाब वाहिणीचे(एलटि)सुमारे सत्तर - ऐंशी पोल पडले आहेत. पाऊस होण्या आगोदर सावखेडा सब स्टेशन येथून काही खेड्यांचा शेती पंपाचा विद्युत पुरवठा दोन-तीन दिवसापासुन खंडीत होता त्यातच पाऊसाचे दमदार हजेरी लावत अनेक पोल पडल्याने खरीप हंगाम बाबत शेतकरी हतबल होऊन गेले आहेत. शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा ब्राह्मणपुरी गोदीपूर या भागात मागील दोन दिवसापासून सोसायट्याच्या वाऱ्यामुळे व पावसामुळे शेतीतील फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी आ.राजेश पाडवी यांनी स्वतः नुकसानग्रस्त शेत शिवारावर जाऊन फळ पिकांची पहाणी केली यावेळी प्रांत अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे,कृषी अधिकारी,तलाठी यांना समवेत तातडीने पंचनामे करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे. पाऊस वर चक्रीवादळामुळे तालुक्यातील १७ गावातील ९७ शेतकरी बाधित झाले असून ८२:६८ हेक्टर शेतीतील केळी पपई आंबा लिंबू या फळबागाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच १०५ खेडे वादळामुळे यांचे अंशतः नुकसान झाले असून पंचनामे करून तातडीने भरीव मदत मिळण्यासाठी आ.राजेश पाडवी यांनी राज्य सरकारला मागणी करणार आहे.
0 Comments