नवीन शैक्षणिक वर्षात आजपासून शाळा सुरू होत आहेत शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय दिवस व्हावा म्हणून संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम राबवत विद्यार्थ्यांची बैलगाडी व बसवरून वाजत गाजत मिरवणूक काढत प्रवेशद्वारावर मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आपल्या शुभहस्ते नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ केला व शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोड तोंड म्हणून केक देण्यात आले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री कमलेश दादा अहिरे व प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक श्री ठाकरे एस ए व प्राथ. मुख्याध्यापक श्री. स्वप्निल भामरे ,व शिक्षक शिक्षकेतर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व सांगत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. स्वप्निल भामरे यांनी प्रास्ताविक सादर करत आजच्या कार्यक्रमाची संकल्पना व नवीन शैक्षणिक वर्षातील रूपरेषा मान्यवर व विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल वाडीले. प्रदर्शन श्रीम . भाग्यश्री राजवाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अधिनिस्त प्राथमिक ,माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 Comments