Header Ads Widget


जायन्टस ग्रुप तर्फे जावदा त हवेली विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:
शहादा जायन्टस ग्रुप व जायन्टस सहेली ग्रुप तर्फे जावदा त हवेली येथिल विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचां सत्कार करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड सह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिसचें डॉ बी डी पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जायन्टस अध्यक्ष डॉ विवेक नगिन पाटील, सामजिक कार्यकर्त्या सुनीता पाटील,सहेली अध्यक्षा स्वाती पाटील, सरपंच संजय माळी, फेडरेशनचें माणक चौधरी, जेष्ठ नागरीक भगवान पाटील,खरेदी विक्री संघाचे संचालक प्रदीप सिसोदिया, फेडरेशन ऑफिसर संजय सोनार , सहेली उपाध्यक्षा आशा चौधरी , अर्चना सोनार मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.या वेळी डॉ बी डी पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन पहिल्या दिवसा पासुन केले पाहिजे शिक्षण थोड कष्टाचे आहे पण त्याचे फळ खुप गोड आहे म्हणुन प्रत्येक पालकांना वाटतं मुलगा शिकला तर दिवस पालतील म्हणुन आभ्यासा कडे दुर्लक्ष करु नका,तसेच डॉ विवेक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी गुणवंत विद्यार्थी दामिनी नरेंद्र पवार ,रोहिणी दगा शिरसाठ, प्रगती राजेंद्र निकुंभ ,जानवी हंसराज चव्हान ,दिव्या भिमसिंग पवार , यशवंत सुरेश शिंदे,प्रियंका लक्ष्मण कोळी, करिष्मा दिपक पटले यांना मान्यवरांचे हस्ते प्रशिस्तपत्र व बशिसे देऊन सत्कार करण्यात आले. या वेळी राजेंद्र सोमजी चौधरी,रमेश पाटील संजय गिरासे,राजेंद्र पाटील, सुनंदा पाटील प्रल्हाद पवार, राजाराम पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणक चौधरी यांनी केले सूत्रसंचालन वैशाली पटेल यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक धनराज, भुपालसिंग यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments

|