Header Ads Widget


नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील लक्ष्मीनारायण ट्रस्ट संचलित लाडकोरबाई विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करून स्वागत करण्यात आले.प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील व संस्थेचे शाखा चेअरमन ॲड. राजेश कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले नंतर त्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.कार्यक्रमात पालकांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा तांबोळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माया जोहरी सह सर्व शिक्षिका उपस्थित होते.विशेष म्हणजे शाळेच्या आवारात विविध रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.प्राचार्य मकरंद पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना तसेच शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

|