Header Ads Widget


शहादा महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटस् बी व सी परीक्षा उत्तीर्ण....

 




 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शैक्षणिक वर्ष 2023 24 या कालावधीत पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा येथील एनसीसी विभागाचा बी सर्टिफिकेटचा निकाल हा शंभर टक्के तसेच सी सर्टिफिकेटचा निकाल 98 टक्के लागला आहे. 

    बी सर्टिफिकेटची परीक्षा विभागीय स्तरीय होते तर सी सर्टिफिकेटची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होते.या विद्यार्थ्यांना पोलीस भरती,आर्मी, नेव्ही, एअर फोर्स भरतीमध्ये कॅडेट्सला लेखी परीक्षेसाठी 20 गुण अतिरिक्त गुण म्हणून दिले जातात.आर्मी ऑफिसरसाठी म्हणजेच शॉर्ट सर्विस कमिशनसाठी सी सर्टिफिकेट परीक्षा बी ग्रेडने उत्तीर्ण झालेले असेल अशांना यूपीएससीची लेखी परीक्षा माफ असून त्यांना डायरेक्ट ग्राउंडला बोलवलं जाते.जे कॅडेटस् बी व सी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, विशेष उल्लेखनीय यश मिळवलेले आहे त्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी कॅडेटच्या भावी आयुष्यासाठी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यशस्वी कॅडेटसला कॅप्टन प्रा.एस.एल.भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments

|