Header Ads Widget


शहाद्याच्या बाईक रायडर योगेश गांगुर्डे लेहलद्दाखच्या रायडिंग साठी दि.15 जून पासून होतोय रवाना....

 


 


   नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत युवा बाईक रायडर योगेश अरविंद गांगुर्डे दि.15 जून पासून जम्मू काश्मीरमधील लेह लद्दाखच्या बाईक रायडिंगसाठी रवाना होत आहे.

     बालवयातच धाडसी गुण अंगी जोपासणारे योगेश अरविंद गांगुर्डे सद्यस्थितीत शहादा येथील वीज वितरण कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयात सेवारत आहेत.गत सुमारे 15 ते 20 वर्षापासून बाईक रायडिंगचा छंद जोपासणारे श्री.गांगुर्डे यांनी आत्ता पावतो 'टिकू टाॅक' या टोपण नावाने बाईक रायडिंग कॅम्पिंगमध्ये सहभाग घेतलेला आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 या मोटर बाईकने त्यांनी सोलो बाईक राईड केल्या आहेत. त्यात दीव, द्वारका, सोरटी सोमनाथ, पावागड, गिरनार, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सांची स्तूप, उज्जैन, ओंकारेश्वर, मंडलेश्वर आदि गुजरात व मध्य प्रदेशातील रस्त्यांवर त्यांनी बाईक रायडिंग केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच बाईक रायडर ठरलेले योगेश गांगुर्डे दि.15 जून पासून सुमारे 6000 किलोमीटरच्या धाडसी बाईक रायडिंगसाठी रवाना होत आहेत .महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू, श्रीनगर, कारगिल, लेह, लद्दाख,मनाली, दिल्ली व परत शहादा असा त्यांचा बाईक रायडिंगचा प्रवास राहणार आहे. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या योगेश गांगुर्डे यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाईक रायडिंगचा विक्रम नोंदवायचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शहादा येथील पंचशील कॉलनीत राहणाऱ्या योगेश गांगुर्डे यांना आई, पत्नी, बहीण व अकरा वर्षीय कन्येची साथ असल्याचेही त्यांनी सुमारे 6000 किलोमीटर अंतराच्या धाडसी बाईक रायडिंगच्या निमित्ताने सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments

|