Header Ads Widget


संबंधित विभागाने निवेदनानुसार काही ठिकाणी कामे केलीत आणि काही ठिकाणी अद्याप काम अपूर्ण; त्वरीत पूर्ण करण्याची मागणी न झाल्यास भाजपा आक्रमक पवित्रा घेईल...

 

 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून 25 मार्च रोजी येथील एम.एस.ई.बी.विभागाकडे जीर्णपोल काढणे व लोंबकळणारे तारा उंच करणे या संदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती निवेदनानंतर संबंधित विभागाने मागणीनुसार‌ काही ठिकाणी कामे केलीत आणि काही ठिकाणी अद्याप काम झाले नसल्याने. कामे तात्काळ पूर्ण करून होणाऱ्या समस्या व वारंवार होणारा खंडीत विद्युत पुरवठा टाळता यावा यासाठी नुकतीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली व चर्चेत सांगितलं की एम एस ई बी विभागाचा अधिकारी आपल्याबरोबर जीर्णपोल व लोंबकळणारे तारेची पाहणी करण्यासाठी पाठवितो त्या नंतर लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करन्यात येतील . भाजपा पदाधिकार्यांनी यासोबत मागणीमध्ये काही दिवसात गणपती देवतेचे आगमन देखील होणार आहे म्हणून गणपती देवा च्या आगमनाला देखील विजेच्या तारांचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी केबल टाकावी अथवा तारा उंच करून द्यावेत हे देखील नमुद केले.  शहरातील सर्व मंडळांना विनंती करतो की आपल्या मंडळापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाला विजेच्या तारांचा अडथळा येत असेल तर कृपया आपण भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. वरील विषया संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना भाजपा शहादा शहराध्यक्ष जितूभाऊ जमदाडे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा, महिला शहराध्यक्ष नंदाताई सोनवणे, शहर उपाध्यक्ष महेश पाटील, शहर महामंत्री राजीव देसाई व योगेश कोठारी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जॅकी शिकलीकर, वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ. व्यंकटेश विभांगिक, व्यापारी उद्योग आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, व्यापारी आघाडी शहर महामंत्री मयुर जैन व तुषार अग्रवाल, माजी सैनिक आघाडी शहराध्यक्ष दिलीप पवार, आध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष योगेश शर्मा, दिव्यांग शहराध्यक्ष रणदीप रायसोनी , सोशल मीडिया प्रमुख महेश महाजन, मनोज सोनवणे, धनंजय चौधरी, सचिन भावसार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|