नंदुरबार /प्रतिनिधी:जलजीवन मिशन योजनेतील हर घर नलसे जल योजने अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामांची तक्रार करण्यात आली. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनची योजनाही बारगळल्याचे चित्र असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते तसेच ग्रामपंचायत अंतर्गतील रस्त्यांचे मो'या प्रमाणावर जलजीवन मिशनचे काम होत असताना पाईपलाईनचे खोदकाम सुरू केल्याने मो'या प्रमाणावर रस्ते आहे.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हे उखडले आहेत. आगामी काळात होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन नागरिकांना तसेच ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर जलजीवन मिशन योजनेतील १६ कोटींच्या कामाची बीले हे काम होण्याआधीच अदा करण्यात आले असल्याची माहिती उघडकीस आली असल्याचा आरोप करीत बीले अदा करणाऱ्या लेखणीकावर कारवाई करण्याची मागणी जिपच्या स्थायी समितीच्या सभेतून करण्यात आली,अध्यक्षतेखाली देण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवा विभागांतर्फ सुरू असलेल्या तर ग्रामपंचायतीला आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या 'ठक्कर बाप्पा योजनेतून विकास कामे करण्यासारी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश हे सरळ 'केदारांना देण्यात आले असून त्या संदर्भात ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर टक्करबाप्पा योजनेतून काम करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा अधिकार देण्यात आला नसल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याचा आरोप करीत याविषयी तक्रार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत
उपस्थित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मो या प्रमाणावर या संदर्भात तक्रारी करण्यात आल्यात तर नंदुरबार जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षणानुसार नवापूर तालुक्यातील खेकडा येथे ग्रामस्थांच्या वापरासारी सामूहिक बोरवेल हे करण्यात आले असून त्या बोरवेलचा वैयक्तिक वापर केला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तसेच जलजीवन मिशन योजनेतील जी कामे पूर्ण आहे तर धडगाव तालुक्यातील बिजरी व मुंदलवड येथील अंगणवाडीचे बिले टीएस होत नसल्याची तक्रार यावेळी बांधकाम विभागात संदर्भात तक्रार करण्यात आली, तर ३०५४ अंतर्गत झालेल्या कामांची बीले तात्काळ अदा करण्याची देखील मागणी करण्यात आली. १३ जून रोजी ६१ शिक्षकांवर गैरहजर राहिल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई केली, व त्यांच्या वेतन कपातिची कार्यवाई करण्यात आली होती, या संदर्भात सर्व शिक्षक ६१ शिक्षकांवर एकसारखी कारवाई अपेक्षित आहे, अशी तक्रार करण्यात आली, तर धडगाव तालुक्यातील मांडवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य रस्त्यापासून ३०० मीटर रस्ता करून देण्याची मागणी करण्यात आली, त्याचप्रमाणे जल जीवन मिशनच्या कामाच्या अहवालहा एक महिन्यात देण्यात येणार होता, तो देण्यात आला नाही तो पुढील आ' दिवसाच्या आत तात्काळ देण्यात यावा, व अहवाल देणार न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे, तर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सतोना येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करण्यात येत यावेळी असलेली पाण्याच्या टाकीचे स्लॅब तयार होण्याआधीच तुटला असल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक कानोळे याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
0 Comments