Header Ads Widget


शहादा तालुक्यातील पूर्वेकडील भागातील ग्रामीण भागात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचून नाले ओसांडून वाहत आहे...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहर सह परिसरात दिनांक १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुमारे ३० ते ४० मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.शहादा शहरात मुख्य रस्त्यांवर तसेच नवीन वसाहतींमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.दरम्यान, कवठळ (ता. शहादा)येथे गंगोत्री फाउंडेशनने खोलीकरण केलेला तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. दिवसभर प्रचंड उष्णतामान होते.४० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहचलेले होते.नागरिकांनी घरातच राहणे पसंत केलेले होते.दिवसभर कोणत्याही प्रकारची ढगाळ वातावरण नव्हते.अचानक सायंकाळी साडेसहा वाजता जोरदार पावसाचे आगमन झाले.शहादा शहराला अर्धा तास पावसाने झोडपून काढले तर पुन्हा शहादा तालुक्यातील पूर्वेकडील भागातील ग्रामीण भागात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचून नाले ओसांडून वाहत होते. शहादा शहरातील शासकीय विश्राम गृह परिसर पुरुषोत्तम मार्केट भाजी मार्केट बस स्थानक परिसर काशिनाथ मार्केट चार रस्ता मेन रोड भागातील व्यवसायिकांची तारांबळ उडाली होती.सर्वाधिक पाऊस ग्रामीण भागात बामखेडा वडाळी कहाटूळ जयनगर कोंडावळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी साचले.नाले प्रवाहित झाले.शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांची धावपळ उडाली होती.मात्र लांबोळा वैजाली प्रकाशा नांदरखेडा डामरखेडा शेल्टी या भागात पाऊस झाला नाही.एकंदरीत शहादा शहर व तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये चांगला पाऊस झाला.कवठळ ला तलाव भरला दरम्यान,कवठळ (ता. शहादा) येथे तीन वर्षांपूर्वी शहादा येथील गंगोत्री फाउंडेशन तर्फे पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून परिसरात नाला खोलीकरण व तलाव खोलीकरण करण्यात आले होते आज परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे.या पाण्याने भरलेल्या तलावामुळे गावासह परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या बोरवेल्सलाही या तलावामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments

|