Header Ads Widget


कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

 



   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा संपन्न झाला.

     शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ नाशिक मार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या ९६.८७ / निकाल लागला आहे.

यात विज्ञान शाखेतून पाटील तनश्री अनिल ८८.३३ (प्रथम) चौधरी ख्याती चुनीलाल , व जैन सृष्टी नितीन ८६.६७ /(द्वितीय) पाटील दुर्गेश्वरी भीमराव ८५.६७ / व जैन हार्दिक त्रिलोकचंद (तृतीय)

कला शाखेतून मराठे धनश्री शांताराम ८०.३३ (प्रथम) देवरे रोशनी शिवम ७४.८३/ (द्वितीय) लोहार त्रिशा संजय (तृतीय) वाणिज्य शाखेतून जैन तनवी नवीन ९२.०० (प्रथम) पाटील माही मनोज ९०.१७(द्वितीय) शितोळे तनवी पंकज(तृतीय) ८९.८३,किमान कौशल्य शाखेतून(इलेक्ट्रिकल) पावरा शुभम प्रेमसिंग ,व वैदू यश विक्की , ७२.१७/(प्रथम), चौधरी ललित शरद ७२/ (द्वितीय) ,पवार अजय मांगीलाल ७९.५०/(तृतीय) (इलेक्ट्रॉनिक) ठाकरे मंगल जगन ७२.१ (प्रथम) पाटील कृष्णा जगदीश ७०.३३ (द्वितीय) ठाकरे राहुल ६८.५० (तृतीय) गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादित केले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येकी एका झाडाचे भेट देऊन वृक्ष लागवडीचे आवाहन केले. जैन श्रुती हिने आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील सोयी -सुविधा व येथील उत्कृष्ट अध्यापनामुळे आपण हे यश संपादन करू शकलो. शिक्षणाबरोबर करिअर व विविध खेळांमध्ये देखील आमची आवड निर्माण झाली अशा भावना व्यक्त केल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. के. पटेल होते.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के. एच नागेश, प्रा.अरविंद पाटील,प्रा.ए. पी. पाटील महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक बंधू- भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.मनोज चौधरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|