Header Ads Widget


शहादा कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा...

 



   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे दि. 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. 

     दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने दि. 5 जून हा दिवस पर्यावरण दिवस पूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या वर्षाची थीम भूमी संधारण, दुष्काळ निवारण व वन नूतनीकरण ही आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल.पटेल यांनी वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे संबोधन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गवांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

|