Header Ads Widget


अंबरनाथ नगरपरिषदेच्या स्वच्छतेकडील दुर्लक्षपणाला रोगराईचा प्रसार..?

 


 



अंबरनाथ प्रतिनिधी/ विशाल कुरकुटे:-
‘स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’ चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. देशाला स्वच्छ करण्यासाठी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, ‘स्वच्छ भारत’ अभियानात कोट्यवधीचा पुरस्कार मिळविणाऱ्या अंबरनाथ शहरात आजही जागोजागी कचऱ्यांचे ढीग आणि दुर्गंधी दिसून येत आहे. शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यांवरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात आणि हे ढीग उचलण्यापेक्षा त्याच ठिकाणी पेटवून देण्यात येत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेने ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’ म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात तर केली पण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सर्वत्र नाल्यात घाणच घाण दिसून येत आहे. गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन शहरासह आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजाराने तोंडवर काढल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.पुरस्कार मिळविण्याकरीता अंबरनाथ शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सूचना फलक, लाऊडस्पीकर, भिंतीवर पेंडिंग यांसह अनेक प्रकारे जनजागृती करीत नगरपरिषदेची मोठी यंत्रणा जोमात कामाला लागली होती. पण पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नक्की स्वच्छतेचे काय झाले? असाच प्रश्न निर्माण होत आहे. परिसरात देखील कचर्‍याने विळखा घातला आहे. या परिसरात स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अंबरनाथ शहरातील नागरिक हे रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने जाता-येतांना दिसत असतात. मात्र, या परिसरात देखील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग राहण्यासाठी येणाऱ्या शहरातील नागरिकांना येथील परिसरातील घाण व दुर्गंधी पाहता येथूनच आरोग्यास धोका होईल, अशी भिती नागरिक व्यक्त करीत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून ही शहरात अस्वच्छता का ? कचऱ्यांच्या गाड्या ज्या ठिकाणी थांबवल्या जात आहेत त्या ठिकाणीच कचऱ्याचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत. तर शहरातील गल्लोगल्ली परिसरात काय अवस्था असणार ? अनेक आजार पसरून नागरिकांचे जीव गेल्यावर आरोग्य विभाग लक्ष देणार का ? की कार्यालयात बसून नागरिकांवर आरोपांवर आरोप करणार ? हे आरोग्य विभागाचे अधिकारी नगर परिषदमध्ये नक्की कोणाच्या कामासाठी व कोणते काम करण्यासाठी कार्यरत आहेत ? कार्यालयात बसून हुकूमशाही करण्यापेक्षा शहरात फिरून समस्यांवर लक्ष दिले तर स्वच्छ शहर, सुंदर शहर होणार नाही का ? असा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशांकडून विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments

|