Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्याची मंसूरी/पिंजारी सामाजिक संस्थेची वार्षीक सर्व साधारण सभा शहादा येथे संपन्न...

 



शहादा प्रतिनीधी/ जुनैद अहमद:
दिंनाक 25/05/2024 शनीवार रोजी मंसूरी/पिंजारी सामाजीक संस्थेची वार्षीक सर्व साधारण सभा मंसूरी जमातखाना शहादा येथे घेण्यात आली,सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा कमेटीचे अध्यक्ष हाजी सुलातन मंसूरी हे होते नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून एकूण पाच तालुका पदाधीकारी व नंदुरबार जिल्हा कार्यकारणी सदस्य आवर्जुन उपस्थीत होते,अजेंड्याच्या विषया प्रमाणे मान्यवरामध्ये सखोल चर्चा झाली जिल्हयात वर्षातून दोनदा कोणत्याही प्रकारचा चंदा न घेता स्वबलावर त्या तालुक्याने ज्याला जिल्हयाने परवानगी दिलेली आहे सामूहीक विवाहाचे आयोजन करावे तसेच समाजाचे अत्यंत ज्वलंत प्रश्न तलाक पीड़ीत,विधवा,जास्त वय झालेल्या मुली या बाबीवर सविस्तर चर्चा झाली सभेत तौसीफ सर नवापुर,आरीफ पिंजारी,नबी भिक्कन,सईद अहमद,मज़ाज़ बशीरोद्दीन,यूनुस सर,नजीर इस्माइल या मान्यवरान्नी आपले विचार मान्डले सभेचे संचालन हाजी कलीम पिंजारी सर यांनी केले सभेच्या यशिस्वीतेसाठी मुन्ना पिंजारी,मज़ाज़ पिंजारी व इतर पदाधीकारी यांनी अथक परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|