Header Ads Widget


विद्युत पुरवठा व कमी दाबाच्या होणारा विद्युत पुरवठा बाबत चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील शहर भाजपातर्फे विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात दिनांक ३० मे रोजी पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन शहरात सातत्याने खंडित होणारा विद्युत पुरवठा व कमी दाबाच्या होणारा विद्युत पुरवठा बाबत चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात रोष व्यक्त केला.चर्चा करतांना उद्योजक आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र भटुलाल अग्रवाल भाजपा जिल्हा युवा मोर्चा महामंत्री हितेंद्र वर्मा महिला मोर्चाच्या नंदा सोनवणे अभय जैन प्रशांत कदम राजीव देसाई भावना लोहार सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.गेल्या दोन महिन्यापासून शहरात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे.वीज ग्राहकांना पुरेसी वीज मिळत नाही.सध्या प्रचंड वाढते उष्णतामान असून दिवसभर वेगवेगळ्या कारणांनी विद्युत पुरवठा बंद करतात त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांची सहनशीलता संपली असून विद्युत पुरवठा सुरळीत व चांगल्या दाबाच्या सुरू झाला नाही किंवा उपाययोजना केली नाही तर विद्युत वितरण विभागाच्या विरोधात जन आंदोलन केले जाईल असा इशारा राजेंद्र अग्रवाल यांनी दिला. विजेचे बिल परस्पर आकारले जाते.वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव दिले आलेली आहेत त्यामुळे नागरिकांच्या रोष वाढला आहे.रात्री देखील विद्युत पुरवठा खंडित होत असतो.विज बिल वेळेवर भरून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नाही.संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ वेळ काढू पणा केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत खांबावरील विद्युत तारा देखील चोरण्याचे प्रमाण वाढले आहे ही गंभीर बाब असून अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सतर्कता दाखवलेली नाही.उपकार्यकारी अभियंता यांनी विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल असे आश्वासन भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments

|