Header Ads Widget


खुल्या जागांमध्ये नगरपालिका प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी अशी मागणी शहादा नागरी हित संघर्ष समितीतर्फे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदन...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील नगरपालिका कार्यालयात दिनांक ५ जून रोजी शहादा शाळेतील नगरपालिकेच्या मोकळ्या जागा अर्थात ओपन प्लेस तसेच विविध वसाहतीत असलेल्या खुल्या जागांमध्ये नगरपालिका प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी अशी मागणी शहादा नागरी हित संघर्ष समितीतर्फे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदन करण्यात आली आहे.निवेदनात शहादा नगरपालिकेमार्फत नागरिकांकडून वृक्ष लागवड कर घेतला जातो माता प्रत्यक्षात वृक्ष लागवड केली जात नाही.जी वृक्ष लागवड केली जाते ती केवळ वनविभागाची मदत घेऊन नावाला केली जाते.नागरिकांचा वृक्ष कर हा मोठ्या प्रमाणात नगरपालिकेला जमा होतो.त्या वृक्ष करच्या वापर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी करण्यात यावा.नगरपालिका मार्फत विविध सेवाभावी संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते व वृक्ष प्रेमींची मदत घेऊन या उपक्रमाला चालना देऊन वृक्ष लागवड करावी.शिरपूर नगरपालिकेने खुल्या जागांमध्ये लिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे.प्रत्येक पालिकेच्या मालकीच्या जागांवर लिंबाची झाडे लावण्यात आली आहे तसा उपक्रम शहादा शहरात राबवण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजना करावी असे निवेदनात म्हटले आहे.शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमींची व्यापक बैठक आयोजित केली जाईल.बैठकीत शहरात वृक्ष लागवड करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.नागरिकांनी स्वतःहून वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे-यशवंत चौधरी -अध्यक्ष शहादा नागरिक संघर्ष समिती. निवेदनावर नागरिक हित संघर्ष समिती अध्यक्ष यशवंत चौधरी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत.सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र भटुलाल अग्रवाल.विनोद जैन संकल्प ग्रुपचे अध्यक्ष पिनाकीन पटेल ग्राहक संरक्षण समितीचे उदय निकूम राजेंद्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अतिन पटेल जयेंद्र चव्हाण राहुल जैन शितल जयस्वाल व मोनू राजपाल उपस्थित होते.मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी वृक्ष लागवडी बाबत सकारात्मक निर्णय दिला आहे.

Post a Comment

0 Comments

|