Header Ads Widget


इन्कलाब फाउंडेशन तर्फे कुबेर नगर वसाहतीत खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण ...

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इन्कलाब फाउंडेशन तर्फे पावसाळ्यापूर्वीच एक सेवाभाव म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इन्कलाब फाउंडेशन तर्फे कुबेर नगर वसाहतीत खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण करतांना सामाजिक कार्यकर्ते सुरजितसिंग राजपाल सह इन्कलाब फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.विशेष म्हणजे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी स्वतःच खड्डे राेपे लावून पाणी टाकून संरक्षणासाठी जाळ्या लावण्यात आल्या.वसाहतीतील नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता.दर रविवारी वृक्षारोपण करण्याच्या निर्धार इन्कलाब फाउंडेशनच्या अध्यक्ष सह सदस्यांनी निर्धार केला असल्याचे सांगण्यात आले.कुबेर नगर मध्ये २० रोपांची लागवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|