Header Ads Widget


वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी बांधवांचे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून मदत करावी अशा प्रकारच्या सूचना व निर्देश;आमदार राजेश पाडवी

   

   


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरासह तालुक्यातील विविध भागात मान्सून दाखल झाला असून वातावरणामध्ये अचानक बदल झाला. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून तापमान 42 ते 44 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याने संपूर्ण वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात होती. तापमानात वाढ झाल्याने बोरवेल विहिरी यातील पाण्याची पातळी खाली गेलेली होती त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न देखील काही दिवसात उभा राहिला असता. परंतु बऱ्याच वर्षानंतर सात जून रोजी मृग नक्षत्रावर सायंकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले अचानक वातावरणामध्ये बदल झाला. वातावरणात बदल होऊन शहादा शहरासह तालुक्यातील सोनवल कहाटूळ मंदाना या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वातावरणामध्ये अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. परंतु वादळी वारा आल्यामुळे शेत पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतातील पीक अक्षरशः कोलमडून पडली आहे तर गावाकडे जाणारी रस्ते यात लावलेली दुतर्फा झाड देखील कोसळून पडले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये झाडं मांडली आहेत आणि त्यामुळे रस्ता बंद झाला व विद्युत धारा देखील काही ठिकाणी तुटल्या होत्या त्यामुळे बऱ्याच वेळ पर्यंत विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला होता. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे हातगाड्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व बरेच वर्षानंतर सात जूनला पावसाचे आगमन झाल्यामुळे परिसरातील नागरिकानी समाधान व्यक्त केलेले आहे. शेतकऱ्यांना देखील वेळेवर शेतात पीक घेता येते व पीक देखील चांगल्या प्रमाणामध्ये येतील असे बोलले जात आहे .शुक्रवारी सायंकाळी सहा येथे दरम्यान शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले , अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत तसेच विजेचे खांबे पडून तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत विभागाने त्वरित दुरुस्ती करून विद्युत पुरवठा नियमित करावे व वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी बांधवांचे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून मदत करावी अशा प्रकारच्या सूचना व निर्देश .संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आमदार राजेश पाडवी यांनी दिल्या असून तरी नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी बांधवांनी त्वरित संबंधीत तलाठी , महसूल अधिकारी व कृषी अधिकारी व विद्युत विभागाचे वीज वितरण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments

|