Header Ads Widget


आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना धनादेश वाटप...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आर्थिक दुर्बल घटकातील 30 विद्यार्थ्याना धनादेश वाटप करण्यात आले.

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारा पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील तिन्ही विद्याशाखेतील 30 विद्यार्थ्याना 2023-24 या वर्षी एक लाख अठ्ठेचाळीस हज़ार रुपये आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. महाविद्यालय विद्यापीठाच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी नेहमी प्रयत्न करते. कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पावणे दोन लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे दि.20 जून रोजी प्राचार्य प्रा.डॉ. एम. के. पटेल व उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा .डॉ. आर. एस. माळी हे उपस्थित होते. ही योजना प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांचे सहकार्य लाभले. या योजनेचा प्रस्ताव विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. एस. माळी यांनी तयार केला होता. सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. जगदीश चव्हाण व महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. सारिका फुलपगारे यांनी सहकार्य केले.याकामी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल, व उपप्राचार्य डॉ. एस डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments

|