नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत असतो.विद्यार्थिनींसाठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक आयोजित केले जाते.दिनांक २१ जून रोजी समर्थ सभागृहात विद्यार्थिनी व शिक्षक तसेच शिक्षकांनी योगा केला.विविध व्यायामाचे प्रकार योगासने केलीत.विद्यार्थिनींमध्ये कमालीचा उत्साह होता.स्वतः मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद सहभागी झालेल्या होत्या.विद्यार्थिनींनी आरोग्य चांगले राहण्यासाठी व तंदुरुस्तीसाठी व्यायामाबरोबर योगासने करणे आवश्यक आहे.योगा करणे उत्तम उपाय असून जीवनात आत्मसात करावी असे आव्हान मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद यांनी केले.
0 Comments