Header Ads Widget


के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.



  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे: आहे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे शुक्रवार दि. 21जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात आला. 

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेंबलीमध्ये भारतीय योग पद्धती या संकल्पनेचे महत्व जागतिक स्तरावर विशद केले होते. तेव्हापासून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.यानिमित्त कृषी महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी योग प्रशिक्षक डॉ.डी.डी.पटेल यांनी प्रत्यक्षरीत्या विविध योगासने ,ध्यान पद्धती आणि प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. त्यांनी सूर्यनमस्कार, दंड स्थिती, बैठे स्थितीतील योगासने करून त्यांच्यापासून होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन जीवनात येणारा ताण, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील एकाग्रता आणि उत्साहासाठी प्राणायाम आणि ध्यान याचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्यांसह प्राध्यापक वृंदांनी सुद्धा सामूहिक योगासने करून नियमित योग करण्याचा निर्धार केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवसापासून नियमित योग करून त्यामध्ये सातत्य ठेवावे असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गवांदे यांनी आभार व्यक्त केले.कृषी महाविद्यालयात जागतिक योग‌‌‌ दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील उपाध्यक्ष जगदीश पाटील सचिव श्रीमती कमलताई पाटील समन्वयक प्रा मकरंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|