Header Ads Widget


तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी येथील तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.तालुक्यात ९५.६४टक्के मतदान झाले.

         येथील तहसील कार्यालयात नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीत मतदान केंद्र क्रमांक चार व पाच असे दोन मतदान केंद्र होते. मतदान केंद्र क्रमांक चार वर गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे तर मतदान केंद्र क्रमांक पाच वर पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे केंद्राध्यक्ष होते. दोन्ही केंद्रांवर सकाळ पासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. ज्या शाळा दुपारच्या सत्रात भरतात त्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी च मतदानाचा हक्क बजवला तर अनेक मतदानासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवल्याने दुपारी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेवटपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यावेळी उमेदवारांचा समर्थकांनी मंडप लावून दिवसभर मतदान केंद्रावर हजेरी लावली.तर संपूर्ण सुशिक्षित मतदार असल्याने वाद, हुज्जत, भांडण आदी प्रकार कुठेही घडला नाही.यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शहादा तालुक्यात १२११ पुरुष तर ४२०स्त्री असे एकूण १६३१ मतदार होते. पैकी ११४३ पुरुष तर ४१७ स्त्री असे एकूण १५६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९५.६४ टक्के मतदान झाले.

Post a Comment

0 Comments

|