Header Ads Widget


शहादा येथे संगणक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित...


 

     नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:नंदुरबार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यावतीने नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी 25 जून ला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

       महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्याचे आय.सी. टी. प्रशिक्षक व जिल्हा समन्वयक उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात आय सी टी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान व्हावे या उद्देशातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोग शाळा व संगणक प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. जूलै महिन्यापासून नविन शैक्षणिक सत्राची सुरूवात होणार असून त्यांची पुर्व तयारी या संदर्भात संगणक प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मागे राहू नयेत याची खबरदारी घेणे शालेय अभ्यासा सोबत संगणक व इंटरनेट यांच्या मदतीने शालेय अध्यापन करणे अश्या विविध बाबी बद्दल या एकदिवशीय शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच शाळेत कार्यरत असलेले विविध विषय शिक्षक यांना त्यांच्या विषयात संगणकाची मदत देत अध्यापन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच शाळेमध्ये शालेय कामकाजात संगणकाची मदत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन असलेली ई लर्निंग, सॉफ्टवेअर यांचे प्रशिक्षण देण्यात आले. एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन हिना कौसर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक विभाग प्रमुख पंकज गिरासे व जिल्हा व्यवस्थापक दिपक पाठक तसेच विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, तसेच संगणक प्रशिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|