Header Ads Widget


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन(लालबावटा) शहादा तालुका कमिटी यांचे वतीने उप विभागीय कार्यालयावर मोर्चा

 



 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन(लालबावटा) शहादा तालुका कमिटी यांचे वतीने उप विभागीय कार्यालयावर मोर्चा देऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाने गायरान व पडीत जमीनीचा कायदा केला आहे. तसेच वनअधिकार कायदा देखील केला आहे. पंरतु वरील दोन्ही कायदयाची अंमलबजावनी न करता या ज्या भुमिहीन लोंकानी पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या जमीनी कसत आहेत अशा जमीनीवरुन हाकलण्यासाठी शासनामार्फत नोटीसा बजावण्यात येत आहेत. तसेच बेघर लोक गायरान व पडीक जमीनीवर घरे बांधुन राहत आहेत. त्यांनाही अतिक्रमण काढण्याचा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने वृध्दपकाळ योजनेची रक्कम 1000/- रु वरुन 1500/- देण्याचे जाहीर केले असतांतना अदयाप पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही या उलट दरमहा 1000/- रु मिळण्याऐवजी दोन दोन तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही व सज्ञान मुले असल्याचा बहाणा करुन त्यांना पेन्शन पासुन वंचित ठेवण्याचा प्रकार चालु आहे. भूमिहीन शेतमजुर अल्प भुधारक व दारीद्र रेषेखालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दरमहा 35 किलो धान्य देण्याएवेजी मानसी फक्त 5 किलो धान्य दिले जाते ते ही वेळेवर मिळत नाही म्हणुन दारिद्रय रेषे खालील कुटुंबाना दरमहा 35 किलो धान्य अंत्योदय योजने मार्फत दिले गेले पाहिजे . महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपाच्या मनुवादी हुकुमशाही राजकारणाला स्पष्ट नकार देत इंडिया आघाडीआणि महाविकास आघाडीला मोठे यश दिल्या बद्दल त्यांचे मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लालबावटा) शहादा तालुका कमिटी हार्दिक अभिनंदन करन्यात आले. निवेदनात प्रमुख मागण्या प्रलंबित वन दावे ताबडतोब मंजुर करुन जमीनीचे वाटप करुन सात बारा देण्यात यावा, गायरान व पडीक जमीनी करणाऱ्यांच्या नावे करा, गायरान व पडीत जमीनीवर घरे बांधलेल्या लोंकाच्या नावे करुन घरकुल योजना लागु करा,वृध्दपकाळ योजना , संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 3000/- रु पेन्शन अदा करा. सज्ञान मुलांची अट रद्द करा, रेशन दुकानमध्ये धान्य घेणाऱ्या कार्ड धारकांना धान्य मिळाल्याची पावती देणे बंधनकारक करणे, भूमिहीन शेतमजुर व अल्प भूधारक कुटुंबाला दरमहा अंत्योदय योजने मार्फत 35 किलो धान्य अदा करा,प्रलंबित अर्थ सहाय्य थकबाकी त्वरीत अदा करावी, शिधापत्रिका शासकीय कार्यालयातुन पुरविण्यात यावी, मंजुराचे स्थलांतर बंद करुन त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करुन देणे,हयात दाखला व उत्पन्नाचा दाखला अट रद्द करावी,हयात फॉर्म जन्म दाखला अट रद्द करावी, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची सज्ञान मुलांची अट रद्द करावी, डीबीटी योजना रद्द करावी, रेशन कार्ड एपीएल व बीपीएल पुरवठा शाखेतुन मिळावे, पगारासाठी शेतीची मर्यादा किती बागायत व जिरायत अट रद्द करावी,सामाईक खात्यावर नाव असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, सन 2023 मध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामे केला गेला बाकीच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला शहादा तालुक्यातील1500 ते 2000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, रोजगार हमी अंतर्गत जे व्यक्तीगत कामे सुरु आहेत त्यांना अकुशल व कुशल पैसे त्वरीत मिळावे. निवेदनावर नथु साळवे, सुनिल गायकवाड, खंडू सामुद्रे, शामसिंग पाडवी, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे , मेहरबान पावरा, लखा पावरा, सुकलाल खर्डे, नारसिंग वसावे, दिलीप ठाकरे, सुकलाल ठाकरे, संजय माळी, जिराबाई ठाकरे , बनू माळी , हारू सोनवणे , हमीद फकीर , उत्तम पवार,कृष्णा ठाकरे ,किरण मोरे , सतिलाल महिरे, मासूम मन्यार, दिनेश पेंढारकर , कैलास चव्हाण, दिनेश गुलाले , रतनसिंग पटले , सुदाम ठाकरे यांच्या साह्या आहेत

Post a Comment

0 Comments

|