Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहादा पोलीस प्रशासनातर्फे नुकताच अमली पदार्थ विरोधी दिन साजरा ....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहादा पोलीस प्रशासनातर्फे नुकताच अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यालयातर्फे शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरे पोलीस कॉन्स्टेबल राठोड मुख्याध्यापक महेंद्र मोरे उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक खान ए.ए.व अनिल खेडकर उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली. यावेळी बोलतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरे यांनी विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रकारच्या व्यसनाधीन होऊ नये.अमली पदार्थांचे सेवन करू नये .विविध आजारांना आमंत्रण असते.शरीरावर दुष्परिणाम होतात.शिक्षकांनी जनजागृती करावी असे आवाहन केले.नंतर वसंतराव नाईक विद्यालयापासून विद्यार्थ्यांची अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती पर शहरातून रॅली काढण्यात आली.शिक्षक देखील सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी माळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|