Header Ads Widget


वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालययात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालययात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक महेंद्र मोरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उप मुख्याध्यापक जे.एम.पाटील उपप्राचार्य जे.बी.पवार पर्यवेक्षक खान ए.ए. व अनिल खेडकर उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांनी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून शैक्षणिक जागृती करण्याच्या निर्धार करण्यात आला.कार्यक्रमाला शिक्षक तसेच शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|