Header Ads Widget


ओबीसी समाज बांधवांच्या मागण्यांसाठी ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीचे उपोषणाला जाहीर पाठिंबा....

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा ओबीसी समाज बांधवांच्या मागण्यांसाठी ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीचे नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे ॲड. मंगेश ससाने गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले असून उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवाय सगे सोयरे च्या परिपत्रकाला विरोध करण्यासाठी भटके जाती-जमातीचे प्रदेश संघटक शहादा येथील जेष्ठ कार्यकर्ते सुपडू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक २१ जून रोजी निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात त्यांनी ओबीसी समाजाने ज्या मागण्या करण्यात आलेले आहेत त्या न्यायिक असून शासनाने ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारच्या अन्याय करू नये.लक्ष्मण हाके व सहकारी नेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन स्वतंत्र समिती गठीत करून सगे सोयरेच्या परिपत्रकाला रद्द करण्यात यावे.कोणत्याही प्रकारची खोटी ओबीसी प्रमाणपत्र कोणालाही देता कामा नये.सर्व पक्षांना सोबत विश्वासात घेऊन तात्काळ प्रश्न सोडावेत अशा मागण्या केलेल्या आहेत.निवेदन देतांना भटके विमुक्त जाती जमातीचे प्रदेश संघटक सुपडू खेडकर जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे राजेंद्र जाधव ॲड. प्रकाश भोई तुकाराम लांबोळे अशोक शिवदे गणेश ढोले आर.डी.मोरे उपस्थित होते त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|