Header Ads Widget


गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर दिं २३ रविवार रोजी सकाळी आयोजित...

 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर दिं २३ रविवार रोजी सकाळी आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता शैक्षणिक संस्थाचे सचिव अभिजीत मोरे असतील गुणवंत विद्यार्थी, पालक यांनी आधिकच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा आयोजित मराठा युवा पर्व कडुन करण्यात आले आहे.

 नंदुरबार जिल्हातील सकल मराठा समाज युवा पर्व कडुन जिल्हातील सकल मराठा समाजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी दिं. २३ जुन सकाळी दहा वाजता पटेल रेसिडेन्सी समोरील अन्नपूर्णा लाँन येथे  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ला दहावी, बारावी व तत्सम वर्गातुन गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करत त्यांना तज्ञाने कडून मार्गदर्शन करणार आहेत. 

       नंदुरबार जिल्ह्य़ातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी यांचे सत्कार व विद्यार्थी यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा जिजामाता शैक्षणिक विद्या प्रसारक मंडळ सचिव अभिजीत मोरे असतील. प्रमुख अतिथी म्हणून. सकल मराठा समाज विभागीय अध्यक्ष श्याम जाधव, संतोष साळुंके (भोइसर) नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील, पांडुरंग मोरे,शहादा. सहा. उप पोलीस निरीक्षक भुवनेश्वर मराठे, शिरीष जगदाळे, संभाजी काळे, संजय गायकवाड, महेश बोराणे, नवनीत शिंदे, डॉ. शिरीष पांडे, अदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर उपस्थित विद्यार्थी यांना संजय जमादार, राजेश जाधव, सार्वजनी उन्नती मंडळ अध्यक्ष लक्ष्मण कदम,व ज्ञानेश्वर सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत नंदुरबार जिल्ह्य़ातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा मराठा यूवा पर्व कडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|