Header Ads Widget


बालाजी रेसिडेन्सी लाॅन येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले...

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील सन १९८७-८८ यावर्षीचे इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थी व गुरुजन शिक्षकांच्या दिनांक २३ जून रोजी सकाळी दहा वाजता दोंडाईचा रस्त्यावरील बालाजी रेसिडेन्सी लाॅन येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या स्नेह मेळाव्यासाठी दुबई येथून देखील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

          या स्नेह मेळाव्याला सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव माजी प्राचार्य जे.डी.पटेल संस्थेचे समन्वयक व माजी प्राचार्य संजय राजपूत सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक आय.झेड.चव्हाण सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक एच.जे.शेख सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एस. पी.जोशी सरकारी वकील ॲड.जसराज संचेती सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी सुकलाल चव्हाण उपस्थित होते.

        या मेळाव्याला ४० ते ५० माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी मित्र परिवारांमार्फत करण्यात आले होते.माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी शासकीय उच्च पदावर तसेच विविध कंपन्यांमध्ये सेवेत आहेत.अनेक विद्यार्थी व्यावसायिक व उद्योजक आहेत काही विद्यार्थी प्रगतशील शेतकरी आहेत काही विद्यार्थी राजकीय सामाजिक कार्यात विविध संघटनेत अग्रेसर आहेत.गेल्या ३६ वर्षानंतर सर्व मित्र एकत्र भेटल्याने त्यांच्यामध्ये कमालीच्या आनंद होता शिवाय उत्साह पूर्ण वातावरण होते.दिवसभर चाललेली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय जीवनातल्या आठवणी एकमेकांनी व्यक्त केल्या.वसंतराव नाईक विद्यालय तसेच शिक्षक व संस्थेविषयी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

             संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव माजी प्राचार्य जे.डी.पटेल संस्थेचे समन्वयक संजय राजपूत सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक एस.पी.जोशी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक एच.जे.शेख आय.झेड.चव्हाण सरकारी वकील ॲड. जसराज संचेती यांनी मनोगते व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.अनेक माजी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतातून गुरुजनांविषयी आदर व सन्मान व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान कार्यक्रमात ॲड.जसराज संचेती यांनी हास्य विनोदाच्या कार्यक्रम सादर केला तर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एस.पी.जोशी यांनी सुंदर गीत सादर केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी करून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संस्काराचे सन्मानाचे अतुट असलेले नाती जोपासण्याचे आव्हान करून आभार व्यक्त केले.माजी विद्यार्थ्यांना मार्फत शिक्षकांना मिठाई व भेटवस्तू देण्यात आली.


Post a Comment

0 Comments

|